श्री संत गोदड महाराज रथयात्रा मोठ्या उत्सवात संपन्न

कर्जत,( प्रतिनिधी) :- गुरुवार, दि १३ रोजी कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव मोठया भक्तीभावाने साजरा झाला. मध्यरात्रीपासून संत शिरोमणी सदगुरु गोदड महाराजांच्या मंदीरात अभिषेक सुरू होता. पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होती. दुपारी एकच्या सुमारास महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेस निघाला असता रथ ओढण्यासाठी भाविकांनी रांग लावल्या होत्या. यावेळी आ रोहित पवार, आमदार राम शिद यांच्या पत्नी आशा शिंदे, खा सुजय विखे यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी संत सदगुरु गोदड महाराज यांचे दर्शन घेतले. काही काळ भाविकांसोबत राहत सेवा पार पाडली.कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव गुरुवारी मोठ्या भक्तीभावाने आणि धार्मिक कार्यान संपन्न झाला. मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई, गाभारा परिसरात फुलांची आकर्षक सजावट डोळ्याचे पारणे फेडत होती. मेघडंबरीस चांदीची सजावट,
मंदिर प्रवेशद्वारास भाविकांनी दिलेली पितळी पायरी मंदिरास शोभा देणारी होती. गुरुवारी मध्यरात्रीपासूनच गोदड महाराज मंदिरात अभिषेकास सुरुवात पंचक्रोशीतील
मानाच्या दिंड्या हरिनामाचा गजर करीत कर्जतमध्ये दाखल होत. सकाळी ९ वाजता मानाचा भगवा ध्वज पोलीस प्रशासनाने सवाद्य मंदिरावर चढविला. तर दुपारी शासकीय पुजा तहसीलदार यांच्या हस्ते यात्रा कमिटीच्या उपस्थितीमध्ये मानकरी, सेवेकरी आणि पुजेकरी यांच्या हस्ते संपन्न झाली. पूजा संपन्न होताच स्थामध्ये मूर्ती स्थापन करताच संत सदगुरु महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी रवाना झाला. यावेळी जयहरीच्या घोषणेने भाविकांनी परिसर दणाणून सोडला होता. दोरीच्या साह्याने रथ ओढण्यासाठी ठिकठिकाणी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चालल्या रथाला नियंत्रीत आणि दिशा देण्याचे काम ओटी लावणारे मानकरी सेवाभावाने करीत असतात. रथाच्या पुढे मानाच्या दिंड्या आपल्या भक्तिमय रंगात न्हावून निघाले. शहरातील ठिकठिकाणी रथास पुष्पहार आणि नारळाचे तोरण अर्पण केले जात होते.
झाली. यावेळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शुक्रवारी शहरात कुस्त्याचा हंगामा भरला जाणार असून या हगाम्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मल्ल हजेरी लावणार असल्याची माहिती संत श्री गोदड महाराज यात्रा कमिटीकडून देण्यात आली. संत सदगुरु गोदड महाराजांच्या रथोत्सवासाठी ईदगाह मैदान, दादा पाटील महाविद्यालय आणि बसस्थानक परिसरात मनोरंजन नगरी उभारण्यात आली आहे. या मनोरंजन नगरीत मोठ-मोठे रहाटपाळ जादूचे प्रयोग, विविध दुकाने आणि खाद्यस्तल असून याकडे देखील हौशी मंडळीनी वर्णों लावली. दोन दिवसात या नगरीत कोट्यवधीची उलाढाल होते