राशीन येथील ईदगाह मैदानाच्या पेवर ब्लॉक सुशोभीकरणासाठी ९.५० लाखाचा निधी मंजूर कामाचा शुभारंभ.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- “सबका साथ सबका विकास ‘ या भारताचे पंतप्रधान मोदींजींच्या घोषणे प्रमाणे, विकास हा शेवटच्या घटका पर्यत पोहचला पाहिजे या ध्येया प्रमाणे माननीय आमदार प्रा श्री राम शिंदे साहेब हे काम करत आहेत . त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय दादा विखे पाटील त्यांच्या सहकार्यातून राशिन ता कर्जत येथील मुस्लिम समाजाच्या ईदगाह मैदानाच्या सुशोभिकरणसाठी ” जन सुविधा ” अंतर्गत ९.५० लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे . या विकास निधीतून ईदगाह मैदानाचे साठी भरीव असे काम होणार आहे . या कामाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष डॉ श्री सुनिलजी गावडे राशिन चे सरपंच निलमताई साळवे, उपसरपंच शंकर देशमुख भाजपा जेष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी यांच्या हस्ते झाला . त्याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त करताना शेवटी आपला माणूस आपलाच असतो आणि आपण हक्काने त्याच्या कडे आपली सुख दुःखे सांगू शकतो . आपल्याच माणसाला आपले दुःख माहित असते, भूमिपुत्रच आपला आमदार पाहिजे, असे म्हणत त्यांनी होणार्या विकास कामाला शुभेच्छा दिल्या … माननीय आमदार प्रा शिंद साहेब पूर्वनियोजित काही कार्यक्रमा मुळे उपस्थित नव्हते तरी त्यांती दूरध्वनी वरून अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त केली . त्यांनी या विकास कामासाठी शुभेच्छा दिल्या व या कामाच्या लोकार्पणाला मी निश्चित हजर राहिल असे अश्वासित केले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे जेष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, सरपंच निलम साळवे,उपसरपंच शंकर देशमुख, ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे ,भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोयब काझी, तात्यासाहेब माने, भिमराव साळवे,भाजपा शहराध्यक्ष एकनाथ धोंडे,बंडा मोढळे,संजय ढगे, ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे,दिपक थोरात,दया आढाव,मुसाभाई काझी,सलीम जहागीरदार, मर्कज चे जमीर काझी,राजु शेख,मज्जिद कुरेशी,साहील काझी, शकील शेख,जब्बार बागवान,बबलु कुरेशी,वसीम शेख, मोहम्मद काझी,शाकीर काझी,वलीम काझी,रहेमान सय्यद,मुस्ताक तांबोळी,रोशन टेलर,शिराज मुंडे, वसीम सय्यद,पापु काझी,पिंटु शेख,मेहराज मुंडे, सद्दाम काझी,मुज्जु काझी,अझरूद्दीन काझी,ताजु काझी,अजिम शेख, युसुफ तांबोळी, इम्रान शेख,सलीम तांबोळी,कुणाल साळवे,मोईन शेख,बब्बु काझी,अलताफ फिटर,वसीम काझी,उस्मान कुरेशी, इम्रान शेख, मतीन शेख,असिफ कुरेशी,इलाही काझी,असिफ नालबंद,असिफ बागवान,जोयब काझी,साहील शेख व मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजातील बांधव मुस्लिम युवक व ग्रामस्थ उपस्थित होते .
माननीय प्रा . श्री राम शिदे साहेब यांच्याकडे हा निधी मिळावा म्हणून समाजातील युवकांना, नेत्यांना बरोबर घेऊन भाजप जिल्हा अध्यक्ष (अल्पसंख्याक) जनाब सोयब भाई काझी यांनी विशेष प्रयत्न केले . हा निधी उपलब्ध केल्या बद्दल मा . प्रा श्री राम शिंदे साहेब यांचे मुस्लिम समाजाने आभार मानत त्यांना धन्यवाद दिले .