लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची कर्जत तालुका व शहरची आढावा बैठक दि ८ एप्रिल रोजी होणार

कर्जत (प्रतिनिधी):-कर्जत तालुक्यातील विविध विषयावर चर्चा करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन विविध विषयावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कर्जत येथे सोमवार दिनांक ०८/०४/२०२४ रोजी दुपारी ११:०० वाजता हॉटेल साई प्युअर व्हेज या ठिकाणी वालवड रोड कर्जत येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष किरण पाटील यांनी दिली आहे.
कर्जत तालुक्यात काँग्रेस पक्षाची चांगली ताकद आहे मात्र सत्तासंघर्षात मित्रपक्षाकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर सतत अन्याय होत असून. निवडणुक आली की पक्षाच्या कार्यकर्त्याची मित्र पक्षांना आठवण येते यामुळे अनेक गावातील कार्यकर्ते नाराज असून याबाबत सर्वाची मते जाणून घेऊन ती वरीष्ठा पर्यंत पोहचवण्याचे काम केले जाणार असून कार्यकर्ते व वरिष्ठ याच्यातील दुवा म्हणून आपण काम करणार आहोत. काँग्रेसकडे गावागावात अनेक निष्ठावंत कार्यकर्ते असून त्याच्याच जीवावर तालुक्यात पक्ष आपली ताकद राखून आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याची मते जाणून घेणे आवश्यक असून त्यावरून पक्षाची भूमिका जाहीर केली जाणार आहे.
अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी पत्रकारांना दिली.