
कर्जत प्रतिनिधी : – कर्जत वालवड रस्त्यावर रेहकुरी फाटा येथे आंब्याच्या झाडाखाली तीस वर्षे युवकाचा मृतदेह आढळला असून संबंधित युवक हा श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे असल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्जत वालवड रस्त्यावर रेहकूरी फाटा येथे आज सकाळी 30 वर्षे युवकाचा मृतदेह आढळला. यानंतर नागरिकांनी तात्काळ याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती कळवली. त्यानंतर संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे आणण्यात आला आहे.
दरम्यान मिळालेली माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील सोपान बाळू जगदाळे व तीस वर्ष काल रात्री घराबाहेर गेला आहे तो परत आला नाही. मित्रांच्या समवेत तो रात्री बाहेर गेलेला आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील ज्या युवकाचा मुक्तदेह आढळला आहे तो आज युवक असल्याची माहितीस ग्रामस्था कडून दुजोरा देण्यात येत आहे.
दरम्यान सोपान जगदाळे याचा खून करण्यात आला आहे का, खून कोणी केला आणि कशामुळे केला याचा शोध लावण्याचे आवाहन पोलीस प्रशासनासमोर आहे.