शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अस्लम पठाण तर उपाध्यक्षपदी वर्षा थोरात

कर्जत (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोळवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे माता पालक यांची मासिक बैठक झाली. या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या नवीन समितीचे गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी अस्लम पठाण तर उपाध्यक्षपदी वर्षा थोरात यांची निवड करण्यात आली. १७ सदस्यीय समितीत ८ महिलांचा समावेश असून ही समिती दोन वर्षासाठी कार्यरत राहणार आहे. नूतन अध्यक्ष पठाण यांनी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची जंगल सफर व्हावी यासाठी रेहेकुरी अभयारण्य येथे एकदिवसीय सहल काढण्याचे जाहीर केले. या सहलीतून विद्यार्थ्यांना वन्य प्राणी, पक्षी व पर्यावरणातील आदी घटनांचा अभ्यास करता येणार आहे.
यावेळी मुख्याध्यापक तथा समितीचे सचिव अनिल खाटेर, शिक्षिका होले, माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ डमरे, औदुंबर भोसले, समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी कवडे, विनोद दवणे, नितीन कांबळे, दत्ता कांबळे, विशाल कांबळे, रमेश कारले व आदी माता पालक उपस्थित होते.