
Samrudhakarjat
4
0
2
1
1
4
कर्जत (प्रतिनिधी) :- विजेच्या धक्क्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे घडली आहे. बहिरोबावाडी चिंचोली फाटा दरम्यानच्या वस्तीनजीक शेतात बुधवारी ही दुर्घटना घडली आहे.सर चेतन सुरेश शिंगाडे, वय :२० असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. शेतात काम करत असताना ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळत आहे. लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांमुळे ही दुर्घटना झाली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील यादव यांनी म्हटले आहे.