
कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे ‘वार्षिक पारितोषिक वितरण’ कार्यक्रमानिमित्त ‘कला व क्रीडा स्पर्धा शैक्षणिक वर्ष २०२२-२३’ निमित्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे ‘एकपात्री अभिनय स्पर्धा, मूक अभिनय स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, फ्लॉवर डेकोरेशन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे संयोजन सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ.प्रमोद परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
क्रीडा विभागाच्या वतीने ‘मॅरेथॉन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, स्लो सायकलिंग स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, क्रिकेट शो मॅच’ या स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांचे समन्वयक म्हणून डॉ.संतोष भुजबळ यांनी काम पाहिले
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे माजी खेळाडू देखील उपस्थित होते. एकपात्री अभिनय स्पर्धा, मूक अभिनय स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा,मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गाईन स्पर्धा,फ्लावर डेकोरेशन स्पर्धा आदी स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले
एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये अंजली अडसूळ, प्रथम साक्षी गांगर्डे, द्वितीय व ज्ञानेश्वर चांगण, तृतीय यांनी यश संपादन केले. मूक अभिनय स्पर्धेमध्ये एम एस पथनाट्य ग्रुपने प्रथम क्रमांक व कर्मवीर ग्रुपने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धांचे समन्वयक म्हणून प्राध्यापक स्वप्निल मस्के यांनी कामकाज पाहिले.
वेशभूषा स्पर्धेमध्ये हर्षदा नरसाळे प्रथम विश्वराज मोहिते द्वितीय व सुजाता देशमुख तृतीय यांनी क्रमांक संपादन केले या स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. भारती काळे व प्रा. रोहिणी साळवे यांनी कामकाज पाहिले.
संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये करण गायकवाड प्रथम, प्रकाश शिंदे द्वितीय, व उषा जगताप हिने तृतीय क्रमांक मिळविला.या स्पर्धेचे संयोजक म्हणून डॉ. बेबी खिलारे यांनी कामकाज पाहिले.
मेहंदी स्पर्धेमध्ये गौरीगौरी पंडित प्रथम प्रियांका गदादे द्वितीय व अमृता पवार तृतीय यांनी यश संपादन केले या स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. भारती काळे यांनी कामकाज पाहिले.
गीत गायन स्पर्धेमध्ये वैष्णवी नागवडे प्रथम नुपूर लाहाडे द्वितीय नुपूर लहाडे द्वितीय व गीता जाधव तृतीय यांनी यश संपादन केले.या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. राम काळे यांनी कामकाज पाहिले.
रांगोळी स्पर्धेमध्ये मानसी हिंगसे प्रथम प्रसाद काळे द्वितीय भाग्यश्री सुद्रिक व आरती करडे तृतीय यांनी यश संपादन केले. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. सुवर्णा गायकवाड व प्रा. शिल्पा तोडमल यांनी कामकाज पाहिले.
फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धेमध्ये सीमा रोडे व मानसी हिंगसे यांनी प्रथम क्रमांक तन्वी राजे भोसले द्वितीय क्रमांक व प्रसाद काळे व भाग्यश्री सुद्रिक यांनी तृतीय क्रमांक मिळविला या स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. संगीता कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.
क्रीडा स्पर्धाक्रीडा स्पर्धां अंतर्गत रस्सीखेच स्पर्धेमध्ये मुलांच्या संघातील तेजस कानगुडे, स्वप्निल वाटाणे, सुशील खरात, गणेश गुंजाळ, आकाश तोरडमल, करण गायकवाड, संकेत सुपेकर, रमेश गांगर्डे, अनिकेत अनारसे, प्रथमेश जाधव, विजय नवसरे, सुमित वाघमारे, अनिकेत अनारसे, प्रणव बागल, श्रीराम मेरगळ या विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
रस्सीखेच स्पर्धेतील प्राजक्ता बाराते, ऋतुजा बर्डे, ऋतिका बर्डे, प्रतीक्षा कोरे, मोनाली जगधने, वैष्णवी दवणे, पल्लवी पावणे या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आकाश तोरडमल, अनिकेत अनारसे, श्रीराम मिरगळ, संकेत सुपेकर, सुमित वाघमारे, करण गायकवाड, विजय नवसरे या विद्यार्थ्याच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला
स्लो सायकलींग स्पर्धेमध्ये निखिल चांगण, किशोर विटेकर, सचिन कवडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या स्पर्धेमध्ये उषा जगताप हिने प्रथम क्रमांक मिळविला.
विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यामध्ये संपन्न झालेल्या क्रिकेट शो मॅचचे विजेतेपद प्राध्यापकांच्या संघाने मिळविले.
कला व क्रीडा स्पर्धा संपन्न करण्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. संतोष भुजबळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा प्रमुख प्रा. शिवाजी धांडे तसेच सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक आणि आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले.