जयश्री आई फडके यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण विकास केंद्र जामखेड कडून विधवा महिलांना साडी वाटप

कर्जत (प्रतिनिधी) : – दि.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित माय- लेकरू प्रकल्पाच्या प्रमुख जयंतीताई फडके यांच्या मातोश्री जयश्री (आई) फडके यांच्या वाढदिवसानिमित्त व भाऊबीजचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील १११ एकल, निराधार, वंचित महिलांना संस्थेच्या माध्यमातून साडी वाटप करण्यात आले.
सिद्धार्थ वसतिगृह, वालवड रोड, कर्जत या ठिकाणी ग्रामीण विकास केंद्राच्या सचिवा मा. उमाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एकल, वंचित, निराधार महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे उदघाटन कर्जत पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी श्रीम. कृष्णा काळे मॅडम व गांगुर्डे मॅडम यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव, कोरो इंडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख सोनम धिवर ताई, माय-लेकरू प्रकल्पाचे समन्वयक सचिन भिंगारदिवे, चांगदेव सरोदे, भाऊ पोटरे, सोमनाथ भैलुमे, रंगीशा काळे आदी यावेळी उपस्थित होते.
जयश्री आई फडके यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील निराधार, वंचित, अत्याचार ग्रस्त, बेघर, बेसहारा, ज्यांना कोणाचा आधार नसलेल्या महिलांनी जळून घ्यायचं नाही, फाशी घ्यायची नाही, औषध प्यायचं नाही, कोणीही मरायचं नाही, त्यांनी ग्रामीण विकास केंद्र जामखेड या ठिकाणी आईचं घरं नावाचा प्रकल्प उभा राहिलेला आहे. त्याठिकाणी येऊन राहायचं आहे,
या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना कर्जत पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी काळे मॅडम बोलताना म्हणाले की, जयश्री आई फडके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यातील विधवा गरजू, गरीब महिलांना साडी वाटपाच्या कार्यक्रमास मला बोलावले हे मी माझे भाग्य समजते. कारण मी गेले अनेक वर्षापासून ग्रामीण विकास केंद्र या संस्थेचे काम जवळून पाहत आहे. की जयश्री आईंची मुलगी जयंती ताई फडके यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यात चालू असलेला माय-लेकरू हा प्रकल्प अगदी तळागाळातील महिलांवरती काम करत आहे. त्या महिलांना त्यांचे नागरिकत्वाचे पुरावे काढून देत आहे, तसेच वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माय- लेकरू प्रकल्पातील सर्व कर्मचारी अगदी जीवाचे रान करून काम करतात. यापुढील काळात ग्रामीण विकास केंद्र संस्थेला लागेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहेत,असे त्यांनी आश्वासन दिले.
ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी प्रथमता कार्यक्रमास उपस्थित सर्वांच्या वतीने जयश्री आई फडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आमच्या आई या विधवा, परित्यक्ता, बेघर, बेसांहारा, महिलांच्या आधार आहे. असे सांगितले. समाजात ज्या लोकांना या न्यायव्यवस्थेने नाकारले आहे. त्यांच्यासाठी ग्रामीण विकास केंद्र व माय-लेकरु हा प्रकल्प काम करत आहे. कोणत्याही महिलेला ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस आम्हा सर्व सहकाऱ्यांना रात्री-बेरात्री मदतीसाठी हाक द्यायचा आम्ही तुमचे भाऊ आहोत, आत्ता तुम्ही रडायचं नाही!! लढायचं आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे असे त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या मध्ये उपस्थित महिलांनी ॲड. डॉ. अरुण जाधव यांचे भाऊबीज निमित्ताने ओवळले.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, नंदू गाडे सर यांनी सूत्रसंचालन केले व संस्थेच्या सचिव उमाताई जाधव यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदू गाडे शुभांगी गोहेर, अर्चना भैलुमे, समता फेलो तुकाराम पवार, राहुल पवार, दिसेना पवार, काजोरी पवार , ऋषीकेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.