राशीन येथे संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन संविधान प्रस्ताविकतेचे वाचन व संविधान चौकाचे नामकरण.

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथे भारताचे सविधान दस्ताऐवजाचे ७५ वे वर्ष आज पासून साजरे करत संविधान चौकात संविधान दिना निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन राशीन च्या सरपंच सौ. नीलम भीमराव साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रस्ताविकतेचे (उदेशिकेचे )वाचन करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांच्या जुन्याआठवणींना उजाळा देत. संविधान चौकाचे नामकरण फलकाचे उद्घाटन देखील सरपंच नीलम साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ नीलम साळवे, रामकिसन साळवे, ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, अतुल साळवे, नवीन सेठ बोरा,अमोल शेटे, कमलेश साळवे, वैभव कुलथे, अशोक आढाव, राजू साळवे, नवनाथ साळवे, विकी साळवे, संतोष डावरे, राहुल बनसोडे पाटील, प्रकाश साळवे, बापू साळवे, शुभम बनसोडे पाटील, सोनू साळवे, यश साळवे, अनार्थ साळवे, अनिकेत साळवे, जय साळवे, वैभव बनसोडे, सौरभ घोडके, ओम काशीद, यश काळे, देवा साळवे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अधिनियमित झाले अमलात आले. संविधानाच्या प्रस्ताविकेत हा उल्लेख आहेच पण हे संविधान भारताच्या लोकांनी याच दिवशी अंगीकृत आणि स्वतःला अर्पण केले, असे स्पष्ट म्हटले आहे. स्वतःला अर्पण केलेले संविधान अंगीकृत करून ते अमलात आणण्याचे काम सातत्याने चालणारे आहे. त्यामुळे दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळणा जातो.