राशीन ग्रामपंचायतीच्या वतीने कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथे राजे भोसले शॉपिंग सेंटर जुना कुंभारगाव रोड येथे राशीन ग्रामपंचायत च्या वतीने २५१५ अंतर्गत ६५ मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी ५ लाख ७० हजार रुपयाचा निधी उपलब्ध झाला असून सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ राशीनच्या सरपंच सौ निलम साळवे यांच्या हस्ते करण्यात आला
याप्रसंगी युवक नेते भीमराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, अमोल जाधव, स्वप्निल मोढळे .भारतीय जनता पार्टीचे तात्यासाहेब माने, अनोज हॉटेलचे मालक शरद आढाव ,
अंबादास जाधव,मारुती जांभळकर,लिंबोरे मॅडम, मंगल गोसावी, अतुल काळे, सोनू गायकवाड,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षापासून खितपत पडलेला रस्त्याचा महत्वकांक्षी प्रश्न ग्रामपंचायत च्या माध्यमातून मार्गी लागत असल्या मुळे अनेक ग्रामस्थांकडून राशीन ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त होत आहे.