साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे यांना भारतरत्न हा किताब केंद्र सरकारने प्रदान करावा ; रमेश सकट

कर्जत (प्रतिनिधी) :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा किताब केंद्र सरकारने प्रदान करावा, मातंग समाजाला अ, ब, क, ड प्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी व मातंग समाजावर राज्यात वाढलेल्या अन्याय-अत्याचारा संदर्भात कार्यकर्त्यांनी मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून संघटीत लढा उभारावा असे आवाहन मातंग एकता आंदोलनाचे नगर जिल्हा संपर्क प्रमुख रमेश सकट यांनी केले.
कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीस मातंग एकता आंदोलनाचे प्रदेश
उपाध्यक्ष चंद्रकांत काळोखे, जेष्ठ नेते भगवानराव गोरखे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ काळे, जिल्हा सरचिटणीस विजय शिंदे, गुलाब तोरडमल, भाऊसाहेब तोरडमल, विजय शिंदे, गणेश शिंदे, योगेश जगधने, प्रभाकर पवार, संतोष ढावरे,आनंद उकिरडे,भाऊसाहेब लोंढे, निखील उकिर्डे, संजय जगताप, विजय गोरखे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. यावेळी सकट यांनी मातंग समाजाची संघटनात्मक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक धोरणात्मक विषयांवर प्रकाश
टाकीत, समाजाचे वर्तमानातील प्रश्न आणि त्या अनुषंगाने संघटनेची भविष्यातील वाटचाल आणि त्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
नगर जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे हे घेणार असून, समाजातील जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना घेऊन नव्या जोमाने नगर जिल्ह्यात मातंग एकता आंदोलन हि संघटना कात टाकणार असल्याचेही सकट यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक बाळासाहेब लोंढे यांनी केले. आभार प्रभाकर पवार यांनी मानले.