‘उत्कृष्ट निवडणूक साक्षरता मंडळ महाविद्यालय’ म्हणून दादा पाटील महाविद्यालयाचा अहमदनगर जिल्हाधिकारी यांचेकडून सन्मान

कर्जत (प्रतिनिधी) :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी जाहीर केलेल्या ०१/०१/ २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमामध्ये नवमतदार नोंदणीकामी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘उत्कृष्ट निवडणूक साक्षरता मंडळ महाविद्यालय’ म्हणून रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांना १४ वा राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त, २५ जानेवारी २०२४ रोजी अहमदनगरचे जिल्हाधिकारी मा. सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय शेंडे यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयाच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक संचालक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.