श्री जगदंबा देवी पालखी यात्रा सोहळा राशीन नगरीत मोठ्या उत्साहात साजरा.

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- उदे बोला उदे उदे बोल भवानी की जय जयघोषाने राशिन नगरी दुमदुमली असून गुलाल खोबरे उधळीत ढोल ताशाच्या गजरात आई जगदंबेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने आलेले दिसून आले.
राशिन गावातील पारंपारिक पद्धतीने नेहमीच्या ठरलेल्या पालखी मार्गावर जाऊन जगदंबेचे मुखदर्शन मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी घेतले . यावेळी पालखी यात्रेनिमित्त मिठाई विविध प्रकारचे,खेळणी, मौत का कुवा, पाळणे, सापसिडी, व इतर अनेक खेळांचा मनमोहक आनंद बच्छे कंपनी, मुली, महिलावर्ग .व इतर भाविक भक्तांनी घेताना दिसून आला .मुख्य बाजारपेठेत मिठाई तसेच इतर जीवनावश्यक वस्तूचे अनेक दुकाने लागली होती. विविध प्रकारच्या वस्तू खेळणी खरेदीसाठी यात्रेला आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसत होती. विशेष म्हणजे वर्षातून एकदाच देवीचे मुख दर्शन गावातील पालखी मार्गावरील नागरिकांना ठिकठिकाणी होतं असल्यामुळे , घरो घरी सडा व रांगोळी ची सजावट पहावयास मिळाली
. पालखी मार्गस्थ रस्त्यावरील घरोघरी देवीची आरती करीत खन नारळाने देवीची ओटी भरत असंख्य भाविकांनी पालखीतील देवीचे मुखदर्शन घेतले. जगदंबा देवी पालखी यात्रे दरम्यान सामाजिक बांधिलकीचा पारंपारिक ऐतिहासिक हिंदू मुस्लिम सामाजिक एकोपा जपत मुस्लिम समाजाच्या वतीने देवी च्या दर्शनासाठी आलेल्या भावीक भक्तांना थंडगार शरबतचे वाटप करण्यात आले. अशा खेळीमेळीच्या वातावरणात जगदंबा देवी पालखी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली.