क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राशीन मध्ये विनम्र अभिवादन.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथे महात्मा ज्योतिराव फुले चौकात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने राशींनच्या लोकनियुक्त सरपंच सौ.नीलमताई भिमराव साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राशींन ग्रामपंचायत चे मा उपसरपंच श्री सुभाष सायकर, चेअरमन श्री महादेव जांभळकर, सावतामाळी उद्योग समूहाचे संचालक श्री.कैलास राऊत,महात्मा फुले संघटनेचे अध्यक्ष श्री कुंडलिक सायकर, ग्रामपंचायत सदस्य श्री अतुल साळवे,श्री नाजीम काझी,हाटेल राजवर्धन चे संचालक श्री सतीश शेठ झगडे, श्रीराम अर्थ मुव्हर्सचे संचालक श्री बापुराव सुखदेव धोंडे, करमनवाडी ग्रामपंचायत चे मा सरपंच श्री अंकुशराव बनसोडे,युवा नेते श्री अजिंक्य राजे राजेभोसले, उद्योगजक श्री श्रीकांत सायकर,श्री दादासाहेब परदेशी,श्री माऊली सायकर,श्री पवन जांभळकर,मा सरपंच श्री रामकिसन साळवे, देशमुख वाडीचे मा उपसरपंच श्री मालोजीराजे भिताडे, डॉ विलास नामदेव राऊत,श्री अतुल राऊत,श्री रुद्रा राऊत, श्री संदिप सायकर,श्री बबन धोंडे तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते… यावेळी सरपंच सौ निलमताई साळवे,श्री माऊली सायकर,श्री मालोजीराजे भिताडे यांनी मनोगत व्यक्त केले.
ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या मनोगतात श्री मालोजीराजे भिताडे यांनी सांगितले की , राशीनच्या श्री जगदंबा विद्यालयाच्या समोर रस्ता झाला परंतु स्पिड ब्रेकर झाले नाहीत प्रशासनास निवेदने अनेक वेळा दिली परंतु प्रशासन कसलीही दखल घेयाला तयार नाही …जर प्रशासनाने कसलीही आणखी पंधरा दिवस दखल घेतली नाही तर आपण स्वखर्चाने स्पीड ब्रेकर बसवून घेऊ अशा प्रकारचा संकल्प आज करण्यात आला .