कर्जत शहर व्यापारी असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शहर व्यापारी असोसिएशनची Mar वार्षिक सर्वसाधारण सभा कर्जतच्या की लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाली. असोसिएशनचे अध्यक्ष बिभिषण खोसे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. मंचावर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपाध्यक्ष महावीर बोरा, सचिव प्रसाद शहा, खजिनदार संतोष भंडारी, सदस्य किशोर बोथरा, सुरेश नहार, योगेश जाधव, स्नेहल देसाई, संदीप गदादे, गणेश तोरडमल विशाल छाजेड, अनिल भोज, श्रीकांत तोरडमल, अतुल कुलथे आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव प्रसाद शहा यांनी कर्जतमध्ये कोणत्याही कारणाने पुकारलेला बंद दुपारी १२ वाजेपर्यंतच पाळावा, त्यानंतर दुकाने सुरळीत सुरु करण्याबाबतचा ठराव मांडला.
त्यावर अध्यक्ष बिभिषण खोसे यांनी व्यापाऱ्यांची संवाद साधला. त्यानंतर उपस्थित सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हात वर करुन हा ठराव सर्वानुमते संमत केला. यावेळी सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदारांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. उपस्थित असलेले पत्रकार मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, आशिष बोरा, मुन्ना पठाण, किरण जगताप, सुभाष माळवे, निलेश दिवटे, भाऊसाहेब तोरडमल, अस्लम पठाण यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक व्यापाऱ्यांना असोसिएशनचे सभासदत्व देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, भाऊसाहेब रान यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमात सीए आनंद खाटेर यांनी जीएसटी व आयकर विषयक मार्गदर्शन केले. प्रतीक देशमुख, रत्नाकर भणगे, सादिक सय्यद, दीपक अनारसे यांनी विमा संरक्षण व गुंतवणूक यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संदीप गदादे यांनी केले. सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले तर अनिल भोज यांनी आभार मानले.
अध्यक्षस्थानाहुन बोलताना बिभिषण खोसे म्हणाले, व्यापारी असोसिएशन ही सर्व व्यापाऱ्यांची मिळून तयार झालेली नोंदणीकृत संस्था आहे. आतापर्यंत ९०० सभासदापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. सर्वांनी सभासदत्व करून घ्यावे. असोसिएशनमध्ये अधिकाधिक सदस्यांना सहभागी करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. व्यापाऱ्यांसाठी यापुढेही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.