राशीन मध्ये विज पडून तीन जनावरांचा मृत्यू!
विद्युत पुरवठा खंडित! रात्र अंधारात २८ तासानंतर विद्युत पुरवठा सुरळीत.

राशीन(प्रतिनिधी):- जावेद काझी.शुक्रवार दिनांक ८.६.२०२४. रोजी राशीन व परिसरात सायंकाळी सात ते पहाटे दोन वाजेपर्यंत विज वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे राशिन मधील इंदिरानगर परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास वीज पडल्याने समीर कुरेशी राहणार इंदिरानगर राशीन यांच्या बाहेर गोठ्यामध्ये असलेल्या पाळीव तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला
असून त्यामध्ये एक बैल, एक राजस्थानी गिर गाय, व दोन महिन्याचे वासरू यांचा जागीच मृत्यू झाला असून या नैसर्गिक आपातकालीन घटने मध्ये समीर कुरेशी यांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. याच वेळी
विद्युत पुरवठा असणाऱ्या 33 kv. तारांच्या खांबावर विज पडल्याने व विद्युत तारा तुटल्याने जवळपास 28 तास राशीन सह परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता परंतु रविवारी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत पडत्या पावसात वीज वितरण मंडळाचे अधिकारी ए.ई टेकाडे . वायरमन खेताडे , वायरमन, प्रदीप सायकर, अक्षय शिंदे, रोहित डोके, तारासिंग जाधव, संदीप साळवे, यांनी कठोर परिश्रम घेत विद्युत पुरवठा सुरळीत केला.