डाक विभागाकडून जोगेश्वरवाडी प्रा. शाळेत विविध योजना व तिकीट प्रदर्शन कार्यक्रम

कर्जत प्रतिनिधी:- भारतीय डाक विभाग, उपविभाग कर्जत (अहमदनगर) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये डाक विभागाच्या विविध योजना आणि तिकिटांचे प्रदर्शन घेण्यात आले . यावेळी डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
अमित देशमुख यांनी डाक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती दिली . यामध्ये सुकन्या समृद्धी योजना ,विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, पत्रलेखन स्पर्धा त्याचबरोबर पोस्टातून मिळणाऱ्या अनेक लाभांच्या योजनेविषयी माहिती दिली . त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या .यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर डाक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या तिकीट प्रदर्शन आणि डाक विभागाच्या विविध माहित्यांचे प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा नामदास यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेमध्ये असा आगळावेगळा उपक्रम राबविल्या बद्दल मुख्याध्यापक अशोक नेवसे, व सह शिक्षक संजय ठोकळ, यांचे सर्व पालकांतर्पे व्यवस्थापन समिती तर्फे कौतुक करण्यात आले. यावेळी सदस्या रेश्मा खरात त्याचबरोबर ताराचंद खरात ,अनिल कचरे ,युवराज कचरे ,सुनील काळे ,राम काळे लक्ष्मण काळे महिला पालक छाया वीर ,सुरेखा खरात , वैशाली खरात, शितल शिंदे, शितल खरात, अश्विनी काळे, शैला शेळके इ . उपस्थित होते.