सिद्धटेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रमेश पवार यांची बिनविरोध निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- दि२६/१२/२०२३ रोजी झालेल्या निवडित सिद्धटेक ग्रा.पं. उपसरपंच म्हणून श्री रमेश पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडी नंतर मोठा जल्लोष करणेत आला. त्यांचा सत्कार करणेत आला . याप्रसंगी बोलताना ” मी प्रा .राम शिंदे साहेब यांच्या मागदर्शनाने आणि त्यांच्या विचारा बरोबर राहून काम करणार आहे . विकासासाठी प्रा . आमदार राम शिंदे साहेबांशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही शेवटी आपला तो आपलाच असतो . असे प्रतिपादन त्यांनी केले .
सिद्धटेक ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले आहे याची सुरुवात ग्रा पं . सिद्धटेक येथील उपसरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल होऊन त्यांन पदच्युत करण्यात आले होते यासाठी सर्व सदस्य एकत्र आले होते यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे श्री रमेश पवार यांची आज उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली .
या निवडी वेळी सर्व सदस्य, ग्रामस्थ, युवक यावेळी हजर होते त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य .श्री पोपट मोरे, श्री सखाराम तांदळे, श्री गणेश भोसले, श्री अभिजित मांढरे, सौ .सुबाबाई जाधव, सौ .रेश्मा खोमणे, सौ . उज्वला बनकर, हे ग्रा पं सदस्य हजर होते . तसेच याप्रसंगी प्रामुख्याने या निवडीसाठी कष्ट घेणारे ग्रामस्थ, कार्यकर्ते हजर होते त्यामध्ये प्रामुख्याने श्री तानाजी नलगे, श्री चिंतामण आंगळे, श्री नागनाथ जाधव, श्री तात्यासाहेब जाधव, श्री बंडा भाऊ मोरे, श्री बाळासाहेब खोमणे, श्री ज्ञानेश्वर बनकर, श्री मच्छिंद्र बनकर, श्री अमित खोमणे, श्री नारायण लष्कर, श्री नंदुकाका कळस्कर, श्री अण्णासाहेब खोमणे, श्री मफतराव मोरे, श्री तुकाराम लष्कर,, श्री दत्ता सांगळे, श्री दादा आत्तार, श्री किशोर सांगळे, श्री गजानन बनकर, श्री काशिनाथ जाधव, श्री नाना मोरे आदी ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने हजर होते .