काळदाते कॉम्प्लेक्स येथील फ्रेण्डशीप कँफे व कँफे मराठी या ठिकाणी कर्जत पोलिसांचा छापा

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शहरातील काळदाते कॉम्प्लेक्स येथील फ्रेण्डशीप कँफे व कँफे मराठी या ठिकाणी कर्जत पोलिसांनी छापा टाकून कॅफे चालक चालक अजय काकासाहेब निंबाळकर रा. दुरगाव ता. कर्जत व कँफे मराठी चालक राहुल बाळु पवार रा. अक्काबाई नगर कर्जत ता. कर्जत यांचेवर म. पो. अधि. चे क. 33 (x) (a) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत चे पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कर्जत शहरामध्ये काँफी शॉप मध्ये खाद्य पदार्थ विक्रीचे नावाखाली तरुण मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पो. नि. बळप यांनी स्वतः स्टाफ सह काळदाते कॉम्प्लेक्स कर्जत येथील फ्रेण्डशीप कँफे व कँफे मराठी येथे छापा टाकला असता त्यांना सदर ठिकाणी मोठ मोठे कंम्पार्टमेंट करून मुला मुलींना जागा उपलब्ध करून दिल्याचे दिसुन आल्याने फ्रेण्डशीप कँफे चालक अजय काकासाहेब निंबाळकर रा. दुरगाव ता. कर्जत व कँफे मराठी चालक राहुल बाळु पवार रा. अक्काबाई नगर कर्जत ता. कर्जत यांचेवर कारवाई केली आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक घनशाम बळप, पो. उप निरी. नागरगोजे, पो. उप निरी. बोऱ्हाडे, पोना वाघ, पोना अंधारे, पोकाँ कोल्हे, कोहक, तिकटे, दंदाडे, रायकर, मपोकाँ राणी व्यवहारे यांनी केली आहे.