दसऱ्या अगोदर ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करा: श्याम कानगुडे.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशिन च्या मुख्य बाजारपेठेतून दौंड उस्मानाबाद रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या ड्रेनीज लाईनचे काम संत गतीने चालू असल्यामुळे दसऱ्या आगाेदर रस्त्याच्या दोन्ही साईटचे काम पूर्ण करून घ्यावेत त्यामुळे रस्त्यावरील दुकानदारांना , ग्रामस्थांना व इतर यात्रेकरूंना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी घ्यावी. तसेच मुख्य बाजारपेठेतील जगदंबा देवी प्रवेशद्वार कमान ड्रेनेज लाईनच्या खोदकामामुळे कमकुवत झाली असल्यामुळे संबंधित ठेकेदाराने श्री जगदंबा देवी कमानीचे काम नव्याने करून द्यावे.
तसेच कोणत्याही प्रकारचा दुजा भाव न करता ठरलेल्या नियमानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूने ड्रेनेजचे समान रेषेत काम पूर्ण करावे कोणा दुकानदारावर व व्यापाऱ्यांवर विनाकारण अन्याय होणार नाही याची दक्षता संबंधितअधिकारी व ठेकेदार यांनी घ्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा कडवट इशारा मा .सभापती पै. श्याम कानगुडे यांनी दिला आहे.