विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे आ.रोहित पवारांच्या हस्ते अभिनंदन

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांना आ. रोहित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रा.राम शिंदे साहेबांच्या या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याला अभिमानास्पद स्थान प्राप्त झाले आहे.
यावेळी आमदार रोहित पाटील, माजी आमदार प्रकाश गजभिये, आणि रविकांत बोपचे हेही उपस्थित होते. सभापती पदासाठी प्रा. राम शिंदे साहेबांची निवड ही त्यांच्या दीर्घकालीन राजकीय योगदानाचे प्रतीक आहे. स्व. ना. स. फरांदे यांच्या पाठोपाठ विधानपरिषदेचे सभापती पद गाठणारे ते अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसरे नेते ठरले आहेत.
प्रा. राम शिंदे यांचे नेतृत्व व कामगिरीने विधानपरिषदेच्या कामकाजात एक नवा दृष्टिकोन आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी प्रा.राम शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विधानपरिषदेच्या या ऐतिहासिक क्षणामुळे जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.