“माऊली दूध संकलन केंद्र” वडगाव तनपुरा संस्थेकडून दूध उत्पादकांना बोनस वाटपसह दिपावली फराळ

कर्जत (प्रतिनिधी) :- “माऊली दूध संकलन केंद्र”वडगाव तनपुरा ता.कर्जत या संस्थेचे चेअरमन श्री अंकुशराव तनपुरे व संचालक श्री. निलेश तनपुरे सरपंच वडगाव तनपुरा यांनी दूध उत्पादकांना बोनस वाटप तसेच दिपावली फराळासह साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले तसेच नूतन नगरसेवक प्रसादजी ढोकरीकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मा.जि.प सदस्य राजेंद्र गुंड यांनी शेती करताना त्याच्या जोडीला दुग्ध व्यवसाय केल्यास त्या शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबाची प्रगती होते. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेतीस जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे वळले पाहिजे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाची दिवाळी गोड होणार आहे. उपस्थित सर्व दूध व्यवसायिकांना दीपावली पाडव्याच्या राजेंद्र गुंडे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी बोलताना उधोजक श्री.शंकरराव नेवसे,प्रा.विशाल मेहेत्रे यांनी शेतकरयांना दिपवाळीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी पृथ्वीराज चव्हाण, सुमित तनपुरे, बाळासाहेब पांडुळे, गुलाबराव तनपुरे मान्यवरांसह दूध व्यवसाय मान्यवरांसह वडगाव तनपुरा गावातील दूध व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते