ब्रेकिंग
मा.ना.रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राशीन मध्ये पेढे वाटून जल्लोष साजरा.

Samrudhakarjat
4
0
1
9
4
9
राशिन( प्रतिनिधी) जावेद काझी .रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना.रामदास आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल राशीन येथे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच मा. रामदास आठवले साहेब यांचे निकटवर्ती विश्वासू सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जिल्हाभर ओळख असणारे रवींद्र दामोदरे यांच्या
वतीने नागरिकांनी पेढे वाटून फटाक्याची आतिषबाजी करीत आनंद व्यक्त करीत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ताआबा गोसावी, नवनाथ कानगुडे, शरीफ भाई काझी,कल्याण जंजिरे, सचिन आडबल, बाळू पंडित, नितीन कानगुडे, तेजस पंडित, मारुती जांभळकर, मेजर राहुल भांडवलकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.