एमआयडीसी संदर्भात औद्योगिक महामंडळ सचिव व उद्योग मंत्री यांना काढल्या नोटिसा : ॲड कैलास शेवाळे

कर्जत (प्रतिनिधी) :- पाटेगाव खंडाळा येथेच एमआयडीसी व्हावी यासाठी पाटेगाव चे सरपंच यांनी हायकोर्ट औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती. मे हायकोर्टाने औद्योगिक महामंडळ सचिव, उद्योग मंत्री उदय सामंत यांना नोटीस काढली आहे. अशी माहिती कांग्रेस चे जेष्ठ नेते ॲड कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ॲड शेवाळे पुढे म्हणाले की,पाटेगाव ग्रामपंचायत चा पाटेगाव खंडाळा येथे होणाऱ्या एमआयडीसी ला विरोध असून खंडाळा येथे निरव मोदी यांची जमीन असल्याने या ठिकाणी आ. रोहित पवार यांनी मंजुर करून आणलेल्या एमआयडीसी राज्य सरकारने रद्द केली.
परंतु पाटेगाव खंडाळा येथे एमआयडीसी होण्यासाठी पाटेगाव ग्रामपंचायत चा विरोध नसून माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत वाघनळी, वंजारवाडी येथील निवासी क्षेत्र व पाटेगाव येथील बागायती क्षेत्र वगळून एमआयडीसी करण्यात यावे असे ठरलेले असताना विधानपरिषदेचे आ राम शिंदे यांनी सरकारचा दबाव वापरून पाटेगाव खंडाळा येथे मंजूर असणारी एमआयडीसी ही कोंभळी थेरगाव येथे नेली जात आहे.
वास्तविक पाहता पाटेगाव खंडाळा हे कर्जत पासून फक्त ८ ते ९ किलोमीटर अंतरावर असून कर्जत च्या जवळ आहे. तर थेरगाव हे तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असून तेथुन नगर ३० किलोमीटर वर आहे त्यामुळे या ठिकाणी होणारी एमआयडीसी कर्जत च्या विकासासाठी हातभार लावू शकत नाही. तर कर्जत च्या व्यापारी वर्गाने मागणी केल्यानुसार व कर्जत च्या जवळच एमआयडीसी करणे गरजेचे आहे. पण आ राम शिंदे यांनी मुद्दाम हून रोहित पवार यांनी आणलेली एमआयडीसी होवू द्याची नाही म्हणून पाटेगाव ग्रामपंचायत चा विरोध, निरव मोदी ची जमीन असे खोटे व दिशाभुल करणारी कारणे पुढे करून पाटेगाव खंडाळा येथील एमआयडीसी सरकारच्या पाठबळावर रद्द केली आहे असा आरोप करून शेवाळे पुढे म्हणाले की,
कर्जत येथील रस्ता रोको आंदोलनात मी सांगितले होते की पाटेगाव खंडाळा येथे एमआयडीसी सरकारच्या होण्यासाठी विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावीन त्या प्रमाणे मी वैयक्तिक याचिका केली होती पण वैयक्तिक याचिका मागे घेवून ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच मनिषा बबन कदम यांनी याचिका दाखल केली त्यामुळेच मे हायकोर्टाने संबंधितांना नोटीसी काढल्या आहेत. पुढे शेवाळे म्हणाले की, पुर्वी च्या सरकारने घेतलेला निर्णय रद्द करता येत नाही त्यामुळे औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानंतरच एमआयडीसी ची जागा निश्चिती होईल असेही शेवाळे यांनी सांगितले
यावेळी उपसरपंच नामदेव लाड, गोकुळ इरकर, सोपानराव जाधव, परशुराम लाड, सत्यवान भंडारे, योगेश झिंजे, उकरे, बंडू सतिश इरकर, सचिन सुरवसे, सतिष बेलस्कर, महादेव शिंदे, नवनाथ डुकरे आदी उपस्थित होते.