डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राशीन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राशीन , ता- कर्जत , जि – अहमदनगर याठिकाणी
पिपल्स रिपब्लिकन पार्टी, कर्जत तालुकाध्यक्ष , युवा नेते मा. कमलेश भाऊ साळवे , ब्लू वोरियर्स स्पोर्ट्स क्लब,राशीन यांच्या वतीने दि : १२ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले,
कमलेश भाऊ साळवे मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. महापुरुषांच्या जयंत्या नाचुन साजऱ्या करण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करावी ना फरशी ना भाला ना तलवार पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे हा बोध घेत भीमसैनिकांनी रक्तदान केले असे कमलेश भाऊ साळवे यांनी बोलताना सांगितले.
कमलेश भाऊ साळवे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे राशीन व पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे.
दि : १३ आज रोजी संपूर्ण मोफत आरोग्य निदान शिबीर आयोजित करण्यात आले, तर
उद्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्कार विद्यार्थी वसतिगृह व संकल्प विद्यार्थी वसतिगृह मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप होणार आहे.तसेच पवित्र रमजान महिन्यानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना सरबत व फळ वाटप होणार आहे.
रक्तदान शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी सनी साळवे,दादासाहेब आढाव, गणेश साळवे, अतुल साळवे, कुलदीप साळवे, योगेश साळवे ,अमोल चव्हाण,स्वप्नील आढाव,शुभम उजागरे,अमित सुकाळे,पवन साळवे,रोहन देवमाने,महेंद्र साळवे,प्रेम आढाव,धनराज आढाव,सनी सुकाळे यांनी सहकार्य केले.त्याच बरोबर राशीन गाव चे सरपंच नीलमताई साळवे, RPI अध्यक्ष नितीन साळवे, मा. सरपंच रामकिसन साळवे इत्यादी मान्यवरणीनी या कार्यक्रमास भेट दिली.