राजबागसवार धार्मिक पवित्र दर्ग्याजवळ राशीन ग्रामपंचायतचे दुर्गंधी युक्त कचरा डेपोचे साम्राज्य !

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन व परिसरातून तसेच महाराष्ट्राच्या इतर कान्याकोपऱ्यातून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले परीट वाडी ग्रामपंचायत हद्दीच्या सीमेवर असलेले राशीन हद्दीमध्ये पूर्वतम काळापासून नवसाला पावणारी राजबागसवार (पीरसाहेब) दर्गा आहे. रोज या दर्ग्यावर अनेक भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात परंतु अलीकडील काळात या दर्ग्याजवळ राशीन ग्रामपंचायतने दुर्गंधीयुक्त कचरा डेपो केला आहे.यामुळे दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांना तसेच या परिसरातील रहिवासी तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे धोक्यात आले आहे. या दर्ग्यावर भाविकभक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी रोज मांदियाळी गर्दी बघावयास मिळते यामध्ये खास करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
नवसाला पावनारा राजबागसवार पिरसाहेब दर्गा असल्यामुळे बाेललेला नवस फते झाल्यावर भाविक भक्त बाेकडाची कंदुरी करतात माेट्या संखेने नागरीक जेवावयास बाेलवतात मात्र पंगतीत जेवण्यास बसलेल्या भक्तांना राशीन गावातील कचऱ्याच्या घंटागाडीतून ओला व सुका कचरा, मृत्यू पावलेले कुत्रे, मांजरी, ङुकरे व इतर पाळीव प्राण्यांच्या दुर्गंधीमुळे तसेच वाऱ्यामुळे दुर्गंधीयुक्त कचरा जेवणाच्या ताटात सुद्धा येतो, यामुळे दर्गा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच राजबागसवर पीर साहेबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी दुर्गंधी युक्त कचरा डेपोची योग्य ती विल्हेवाट लावावी अन्यथा तीव्र आंदोलन ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा भाविक भक्तांनी व परिसरातील इतर नागरिकांच्या वतीने राशिन ग्रामपंचायतला देण्यात येत आहे.
एका महिन्याच्या आत दुर्गंधीयुक्त कचरा डेपो हलवावा अन्यथा राशिन व परिसरातील भाविक भक्त यांच्या कडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी राशिन ग्रामपंचायत ची असेल.
याकडे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व सर्व सदस्य यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून दुर्गंधी युक्त कचरा डेपो दुसरीकडे हलवावा व भाविक भक्तांना न्याय द्यावा.