मकतबे दारूल कूरान राशीन च्या वतीने जलसा ए-आम चा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

राशीन (प्रतिनिधी ):-जावेद काझी.राशीन येथे शुक्रवार दिनांक.८/३/२०२४. रोजी. रात्री ८ ते १० च्या वेळेत मक्का मस्जिद समोर जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या ग्राउंड वर काझी गल्ली येथे मकतबे दारुल कुराण राशीन यांच्यावतीने ३ या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजातील लहान मुलां-मुलींनी उर्दू ,अरबी, हिंदी,जलसा-ए-आम. कार्यक्रमात भाषणे करीत आपले कौशल्य दाखवत ,या जलशा मध्ये कुराण चे पठण,नातं, पालकांची जबाबदारी वर माहिती, मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित माहिती, लहान मुलांचे प्रश्न उत्तरे, नमाज, जकात, सदका,रोजा, व्याज घेणे विषयी माहिती, परद्या विषयी माहिती, नमाज पडण्याविषयी माहिती या मकतबे दारुल कुरान राशीन येथे शिकत असलेल्या लहान मुला मुलींनी आपल्या भाषणातून यावेळी उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांना, भगिनींना दिली. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात उत्कृष्ट वक्तृत्व करणाऱ्या लहान मुला मुलींना सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख मान्यवर(करी सय्यद मसीहुद्दीन साहब इशाअति) यांच्या मार्गदर्शनाखाली जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मौलाना हंजाला साहेब यांनी मुकरीरे खुसुशी पाहुण्यांचे स्वागत केले. (कारी अन्सार साहेब यांनी सामाजिक व धार्मिक विषयावर मुस्लिम बांधवांना प्रवचन दिले. कर्जत येथील समशेर सर यांच्यावतीने मुलांना धार्मिक पुस्तके , बक्षीसे देण्यात आले. या संपूर्ण जलसा कार्यक्रम साठी महत्त्वपूर्ण विशेष मोलाचे सहकार्य सोयब (काका) रियाजुद्दीन काझी यांचे व इतर मुस्लिम बांधवांचे लाभले.
सूत्रसंचालन मौलाना अब्दुल रहीम व मौलाना शहानवाज कुरेशी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार शहानवाज कुरेशी यांनी मानले.