
कर्जत (प्रतिनिधी) :- दादा पाटील महाविद्यालय मध्ये १४ सप्टेंबर रोजी संपन्न होणाऱ्या हिंदी दिनानिमित्त हिंदी दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, काव्य लेखन, सामान्य ज्ञान, शेरोशायरी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
हिंदी दिनानिमित्त सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय केडगाव येथील डॉ. नानासाहेब जावळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये भविष्य काळामध्ये हिंदी भाषा बोलणाऱ्यांची संख्या जगामध्ये एक क्रमांकापर्यंत पोहोचू शकेल असा आशावाद व्यक्त केला. हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. हिंदी ही जनजागरणाची भाषा आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते मात्र या सगळ्या भाषांना एकत्र करण्याचे काम हिंदी भाषा करते. संतांच्या काळात समाज सुधारण्याचे काम हिंदी भाषेने केले आहे असे प्रयत्न प्रतिपादन त्यांनी आपल्या व्याख्यानातून केले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी हिंदी भाषेचा अंगीकार व स्वीकार करून हिंदी भाषेतून विचार व्यक्त करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी डॉ. नंदकुमार जाधव, डॉ.तन्वीर शेख, स्नेहल गायकवाड, सुशीला देशमुख, प्रा. बापू मांडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागाचे उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बेबी खिलारे यांनी केले. तर आभार प्रा. किरण भोसले यांनी मानले.