राशीन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांचा वाढदिवस साजरा

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मारुती मुळुक साहेब यांचा राशीन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने कर्जत पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच पुढील वाटचालीस मुळूक साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी मुळुक साहेबांनी देखील मुस्लिम बांधवांना येणाऱ्या बकरी ईदच्या शुभेच्छा देत कुर्बानी च्या बाबतीत न्यायालयाने दिलेल्या नियम अटी व आदेशानुसार
मुस्लिम बांधवांनी कायद्याच्या चौकटीत राहून कुर्बानी करीत बकरी ईद साजरी करावी. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करीत कर्जत तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा अल्पसंख्या प्रदेश उपाध्यक्ष सोयब काझी, पत्रकार जावेद काझी, राजू भाई शेख, जब्बार भाई बागवान, समीर तांबोळी, जोयब काझी, रौफ अलीम साहब, हाफिज रहीम, आसिफ बागवान व इतर मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.