दादा पाटील महाविद्यालयाच्या सोनाली मंडलिक व संस्कृती शिंदे यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे. तसेच कबड्डीपट्टू संस्कृती जयदीप शिंदे हिची आंतरविद्यापीठ अश्वमेध कबड्डी स्पर्धेत निवड झाली आहे. सदर खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभले.
कुस्तीपटू सोनाली मंडलिक व कबड्डीपट्टू संस्कृती जयदीप शिंदे हिच्या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक संचालक डॉ. संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.