संत गोदड महाराज दिंडीतील : वारकऱ्यांना टोप्याचे वाटप
कर्जतच्या अतुल ट्रेडिंगचे अशोक कोठारी यांचा पुढाकार

कर्जत (प्रतिनिधी):- कर्जत येथून पैठण वारीसाठी निघालेल्या संत श्री गोदड महाराजांच्या दोन पायी दिंडी मध्ये सहभागी असलेल्या वारकऱ्यांना उन्हाचा चटका बसू नये म्हणून टोप्याचे वाटप करण्यात आले. सोनाई पशु आहार यांचे सह कर्जत येथील अतुल ट्रेडिंग कंपनी व राशीन येथील जगदंबा डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत ते पैठण या मार्गावरील अमरापूर येथे या टोप्याचे वाटप करण्यात आले.
कर्जत येथील संत श्री गोदड महाराज यांच्या पायी दिंडी निघालेल्या असून पैठण येथील संत श्री एकनाथांच्या भेटीसाठी या दिंड्यांमध्ये अनेक महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना दररोज पायी चालणाऱ्या या भाविक वारकऱ्यांना उन्हापासून संरक्षण म्हणून कर्जत येथील
अतुल ट्रेडिंग कंपनीचे ॲड. अशोक कोठारी, रवींद्र कोठारी, दत्तात्रय गलांडे, शरद पानसरे यांच्या हस्ते या टोप्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आबा पाटील, काकासाहेब धांडे, प्रवीण घुले, नामदेव राऊत, अनिल भोज, डॉ अनिल साळुंखे, तानाजी पाटील, सचिन गुंड, अंबर शेठ भोसले, छायाताई शेलार, विलास निकत, नवनाथ मोडके, चंद्रकांत मुळे, शहाजी पिसाळ आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.