पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या शाखेत जो गैरव्यवहार झाला त्याला जबाबदर कोण? : निलेश तनपुरे

कर्जत (प्रतिनिधी) :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत जो गैरव्यवहार झाला त्याला जबाबदर कोण? याचे उत्तर सत्ताधारी पॅनलचे उमेदवार तथा बारामती (पंधारे) राजेंद्र जगताप यांनी द्यावे. नाहीतर तुमची पळता भुई करू असे आव्हान संतोष मेहेत्रे यांच्या विधानावर सैनिक बँक परिवर्तन पॅनलचे उमेदवार निलेश तनपुरे यांनी दिले आहे.
सैनिक बँकेच्या निवडणूक प्रचारास सुरुवात झाली असून कर्जत, जामखेड,
श्रीगोंदा मतदारसंघातून तीन जागेसाठी सहा उमेदवार उभे आहेत. कर्जत येथील प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी निलेश तनपुरे म्हणाले, कर्जत शाखेत सत्ताधारी मंडळींनी मनमानी कारभार केला. त्यांच्या मनमानी कारभारामुळे संजय गांधी निराधार सारख्या गोरगरिबांच्या योजनेत अपहार झाला, त्यामुळे कर्मचारी निलंबीत आहे. तर १ कोटी ७९ लाख रुपयांचा चेक घोटाळ्यात अनेक कर्मचारी का फरार आहेत ? याचे उत्तर राजेंद्र जगताप यांनी सभासदांना द्यावे, असे आव्हान निलेश तनपुरे यांनी दिले आहे.