
कर्जत प्रतिनिधी : -आमदार रोहित पवार यांचा शालेय विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा सर्वश्रुत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे, विज्ञान प्रदर्शने, मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप, मुलांच्या सांस्कृतिक विकासासाठी बाल साहित्य परिषदेचे आयोजन, क्रीडा साहित्याचे वाटप, शाळांना शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय, खाऊ वाटप, शालेय साहित्याचे वाटप अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने विद्यार्थ्यांना मदत करत आले आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहावेत, मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पवार सातत्याने प्रयत्नशील दिसतात. याचीच प्रचीती आता पुन्हा एकदा येणार आहे. तालुक्यात अनेक असे हजारो विद्यार्थी आहेत की ज्यांना शाळेत पायी जावे लागते. मिळेल त्या वाहनात बसून किवा ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करून शिक्षणसाठी विद्यार्थी शाळांमध्ये येत असतात.
शाळेत जाण्यासाठी सोय नसल्यामुळे अनेक गरीब मुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून शाळांच्या सहकार्यातून अशा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती ॲग्रो लिमिटेड आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २६ मार्च २०२३ रोजी दुपारी ठीक ३:३० वाजता फाळके पेट्रोल पंपाशेजारील मैदान, कर्जत याठिकाणी करण्यात येणार आहे. मतदारसंघातील पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या तब्बल १० हजार गरजू विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचा वेळ वाचावा आणि अभ्यासावर अधिक लक्ष देता यावं या हेतूने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल वाटप करण्यात येणार आहेत.
तरी सर्व नागरिकांसह पत्रकार बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अहवान आ.रोहित दादा पवार यांनी केले.