राशीनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथे आंबेडकर नगर , मुख्य बाजारपेठ दौंड – उस्मानाबाद रोड , आंबेडकर चौक , भीम नगर , नील क्रांती चौक चौक,निळा झेंडा चौक या विविध ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंतीनिमित्त त्रिवार विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये खा. सुजय विखे पाटील , माजी मंत्री प्रा. राम शिंदे , सरपंच नीलम भीमराव साळवे , उपसरपंच शंकरराव देशमुख यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी सामूहिक भीमवंदना घेण्यात आली. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष डी . एस . कांबळे , शहाजी राजेभोसले , जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ , दादा सोनमाळी , भाजपा नेते अल्लाउद्दीन काझी , डॉ . राजकुमार आंधळकर , भीमराव साळवे, भाजपाचे अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश सचिव सोयब काझी , प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष साहिल काझी, दत्ता गोसावी,पांडुरंग भंडारे, एकनाथ धोंडे, भाजपा राशीन शहराध्यक्ष शिवाजी काळे, भाजपा अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जमीर काझी ,आरपीआयचे शहराध्यक्ष नितीन साळवे , देशमुख वाडी मा.उपसरपंच मालोजी राजे भीताडे,ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, अशोक जंजिरे, अतुल साळवे , स्वप्निल मोढळे , नाझीम काझी ,श्रीकांत साळवे , दीपक थोरात , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सद्दाम काझी,बबलू भाई कुरेशी, कॉन्ट्रॅक्टर मतीन शेख , निहाल काझी, मुज्जू काझी, हाफिज अफजल,शरद आढाव , माजी सरपंच रामकिसन साळवे , गणेश कदम, दत्ता आढाव , भारत साळवे ,
डॉ . अविनाश साळवे , दयानंद आढाव , अंकुश साळवे , दादा आढाव , रामदास घोडके , पी आर पी चे तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतुल साळवे यांनी केले . सूत्रसंचालन नवनाथ आढाव यांनी केले .