ब्रेकिंग
1 मे पासून वाळू ६०० रुपये ब्रासने मिळणार:- राधाकृष्ण विखे पाटील

Samrudhakarjat
4
0
1
9
5
1
राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- वाळूचा उपसा आणि वितरणाबाबत राज्य सरकारने नवे धोरण नुकतेच जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर माहिती देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की,
आपल्या नगर जिल्ह्यात १ मे पासून सर्वांना सरकारी डेपोतून ६०० रुपये या ब्रास दराने वाळू उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे ६०० रुपयांमध्ये वाळू वाटप करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे तसेच बांधकाम क्षेत्राचा प्राण असलेली वाळू जिल्ह्यात महाराष्ट्र दिनापासून म्हणजे एक मे पासून ६०० रुपये ब्रास या दराने मिळणार असल्याची घोषणा महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी दिनांक 14 ला केली.