राशीन ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेला मान्यता! मार्चपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षांमध्ये कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या राशीन सह ८३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे.
नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रभाग रचनेला मान्यता दिली आहे. आता आरक्षणाचा पुढील टप्पा राबविला जाणार आहे. नगर जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ या 2024 वर्षभरात पूर्ण होत असून. राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाने ता.४ डिसेंबर 2023 रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यावर हरकती दाखल केल्या होत्या. या हरकतीची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही यादी नाशिक विभागीय आयुक्त कडे मान्यतेसाठी पाठवली होती. त्यांनी प्रभाग रचनेला मान्यता दिली आहे. आता या प्रभागातील आरक्षणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मार्च 2024 अखेर पर्यंत निवडणूक होण्याची शक्यता आहे. कर्जत तालुका निहाय ग्रामपंचायती प्रमाणे राशिन सह काळेवाडी, सोनाळवाडी, तोरकडवाडी, देशमुख वाडी, परीट वाडी, आबी जळगाव, खातगाव, लोणी मसदपूर, जळकेवाडी, माही, निंबोडी, सितपूर, शिंदे, जळगाव, नवसरवाडी, बिटकेवाडी, या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.