राशीन ग्रामपंचायत च्या वतीने तांबोळी कब्रस्तान पेवर ब्लॉक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- युवक नेते राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तांबोळी समाजाच्या कबरस्तान च्या सुशोभीकरणासाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत कब्रस्तान मध्ये पेविंग ब्लॉक बसवणे कामासाठी १ लाख ५० हजार रुपये कामाचा शुभारंभ राशीनच्या लोकाभिमुख सरपंच सौ. नीलम भीमराव साळवे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच युवक नेते राजेंद्र देशमुख मित्र मंडळाच्या वतीने याप्रसंगी हाय मॅक्स पथदिव्याचे लोकार्पण सौ नीलम साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवक नेते राजेंद्र देशमुख, भीमराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य अमोल जाधव, शिवसेना नेते सुभाष जाधव, आशु तांबोळी, दस्तगीर भाई तांबोळी, युसुफ तांबोळी, निसार तांबोळी, बाबा तांबोळी, वसीम तांबोळी, हाफिज मुजेब, फिरोज तांबोळी, हमीद तांबोळी, राजू तांबोळी, अंबादास जाधव व इतर तांबोळी समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीर्घकाळापासून महत्वकांक्षी प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे तांबोळी समाज बांधवांनी मार्गदर्शक राजेंद्र देशमुख व राशीन ग्रामपंचायतीचे अभिनंदन करीत आभार मानले.