राशिन ग्रामपंचायत च्या माध्यमातून गुरव समाज स्मशानभूमी चा भूमिपूजन शुभारंभ.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- आज दिनांक 24/12/2023 रोजी वॉर्ड क्रमांक एक मधील गुरव स्मशानभूमी वॉल कंपाऊंडचे नारळ फोडून भुमीपुजन शुभारंभ करण्यात आला. बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित व प्रलंबित असलेले काम आज प्रत्यक्षात साकार होत असून या कामाला सुरुवात झाली ,युवक नेते श्री. राजेंद्र भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच सौ.निलम भिमराव साळवे यांच्या व ग्रामपंचायत सदस्या सौ सारीका अमोल जाधव यांच्या संकल्पनेतून 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून रक्कम रुपये पाच लाख मंजुर करून आज सर्वच गुरुव बांधवांच्या उपस्थितीत वॉल कंपाऊंड कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच युवक नेते राजेंद्र भैय्या देशमुख मित्र मंडळाच्या वतीने गुरव समाजाच्या स्मशानभूमीसाठी हाय मॅक्स स्टेट लाईट पथदिवा भेट स्वरूपात याप्रसंगी देण्यात आला .यावेळी युवक नेते राजेंद्र भैय्या देशमुख सरपंच नीलम भीमराव साळवे, ग्रामपंचायत सदस्या सारिका अमोल जाधव, युवक नेते भीमराव साळवे , अमोल जाधव,तात्यासाहेब माने अंबादास जाधव ,.अशोक माने ,पप्पू शेठ मासाळ, सुनील काका रेणुकर, श्रीकांत रेणुकर, पोपट साहेब रेणुकर , प्रकाश अण्णा रेणुकर सचिन रेणुकर वकील साहेब, विश्वास काका रेणुकर पत्रकार , विलास रेणुकर शिरीष रेणुकर, दीपक शेठ क्षिरसागर ,जीवनसेठ रेणुकर ज्ञानेश्वर रेणुकर डॉक्टर रेणुकर, रमेश भोज ,विशाल रेणुकर ,मंगेश वाघमारे, विक्रम तात्या रेणुकर, पप्पू शेठ शिरसागर, शुभम रेणुकर, मयूर रेणुकर इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.