आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळेच राशीन चारीला मुबलक पाणी मिळाले: किशोर काळे

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळेच
राशीन चारी इतर ठिकाणी भरपूर पाणी सोडल्यामुळे शेतकरी आनंदी झाला असून पाऊस अजिबात नसताना हे पाणी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे . याच हक्काच्या पाण्यासाठी माननीय आमदार रोहित दादा पवार यांनी मंगळवारी कोळवडी येथे शेतकरी व अधिकारी यांची एकत्रित मीटिंग घेतली आपल्या तालुक्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत पाणी होते शेतकऱ्यांनी आमदार रोहित दादा यांच्याशी संपर्क साधून 31 तारखेपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांची तहान भागणार नाही म्हणून दादांकडे आग्रह केला असता कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून तसेच जलसंपदा मंत्री यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून तालुक्यासाठी पाच दिवसांचे आवर्तन वाढवून घेतले यामुळे राशीन भागात शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यामुळे
राशीन सह तालुक्यातील शेतकरी वर्ग आनंदित झाला असून बबन श्रीचंद काळे, रोहिदास हरिचंद्र काळे, राहुल पांडुरंग पोटरे, माऊली शेठ कदम ,सागर कदम, गणेश काळे , किशोर काळे, सचिन काळे , तसेच सर्व शेतकरी व कार्यकर्त्यांकडून कार्यशील पाणीदार आमदार रोहित दादा पवार व संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त होत आहेत.