google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशीनमध्ये श्री जगदंबा विद्यालयात कर्मवीर अण्णांची जयंती व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

Samrudhakarjat
5 1 0 2 5 0

राशीन (प्रतिनिधी) : जावेद काझी.  :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३९ वा जयंती सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहूराजे राजेभोसले होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उद्योजक मेघराज बजाज, बापू सुखदेव धोंडे, उद्योजक रामदास सलगर, भास्कर मोढळे, बिभीषण जंजिरे आणि प्रमुख वक्ते म्हणून श्रीगोंदा येथील प्रा. अजित खरसडे उपस्थित होते.

मुख्य भाषण करताना प्रा. अजित खरसडे यांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक योगदानाचा उजाळा देत ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. “शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी दारे उघडी करण्याचे कर्मवीरांचे कार्य आजही सर्वांसाठी तितकेच प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शिस्त, योग्य संस्कार आणि सामाजिक जबाबदारीचे भान जपण्याचे महत्त्व पटवून दिले. यासोबतच उद्योजक रामदास सलगर व भास्कर मोढळे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

गुणवंतांचा पाठीवर थाप मारून सन्मान

या सोहळ्यात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे रामकिसन साळवे, माऊली सायकर, विक्रम राजेभोसले, अशोक जंजिरे, दादासाहेब परदेशी, मालोजीराजे भिताडे, एम. डी. कानगुडे, मधुकर दंडे, माजी रयत सेवक नेटके सर, खंडागळे सर, कानगुडे सर, सय्यद सर, झगडे सर, सोनवणे सर, शेटे सर, साळवे सर, रुद्र दादा राऊत, अंबादास गव्हाणे, अंकुश साळवे, विजय साळवे सर, घायाळ काका यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक, आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश उढाणे यांनी केले. सूत्रसंचालन भगवान शिंदे व सौ. पल्लवी घोडके यांनी उत्तमरीत्या सांभाळले, तर उपस्थितांचे आभार किशोर करपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker