pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Samrudhakarjat
4 6 5 2 9 3

कर्जत, २१ जून – न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येऊन विविध योगासने करत योग दिन साजरा केला.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावरील महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की, “२१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो आणि योग व अध्यात्मासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ‘योग’ ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे.”

या वेळी समन्वयक श्री. किरणजी नाईक, पर्यवेक्षक श्री. राजेंद्रकुमार काळे आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता. योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे नियमित अभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

शेवटी, विद्यार्थ्यांनीही योगाचे विविध प्रकार सादर करत, निरोगी आयुष्याचा संदेश दिला. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker