pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुका वकील संघ निवडणुकीत ॲड. संग्राम ढेरे यांचा दणदणीत विजय; समर्थकांचा गुलालाची उधळण करत जल्लोष…

Samrudhakarjat
4 6 3 0 9 6

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत तालुका वकील संघाच्या कार्यकारिणीची वार्षिक निवडणूक अत्यंत उत्साहात पार पडली असून, यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. संग्राम ढेरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत शानदार विजय मिळवला आहे. या निवडणुकीत ॲड. संग्राम ढेरे यांना ५७ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि ॲड. कैलासराव शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलचे उमेदवार ॲड. राहुल जाधव यांना ३७ मतांवर समाधान मानावे लागले. ढेरे यांनी २० मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले…

या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरस बघायला मिळाली. ॲड. संग्राम ढेरे यांच्या पॅनेलच्या ॲड. साधना सुपेकर यांनी खजिनदार पदावर, तर ॲड. अमरनाथ खरात यांनी ग्रंथालय सचिव पदावर विजय मिळवला. दुसरीकडे, विरोधी पॅनेलचे ॲड. दत्तात्रय चव्हाण यांची उपाध्यक्षपदी आणि ॲड. अविनाश मते यांची सचिवपदी निवड झाली आहे. तसेच यापूर्वी अपक्ष म्हणून ॲड. आरती टकले हिची बिनविरोध महिला सचिवपदी निवड झाली होती.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कर्जत न्यायालय परिसरात सर्वच वकील सदस्यांनी एकत्र येत मोठा विजयोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत नवनिर्वाचित अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ वकिलांसह सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. संग्राम ढेरे व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. वकील संघाच्या हितासाठी आणि वकिलांच्या विविध प्रश्नांवर ही नवीन कार्यकारिणी जोमाने काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker