गायक-वादकांच्या सुरांनी रंगली कोजागिरी पौर्णिमा – श्री संत अमरसिंह विद्या प्रतिष्ठानचा उपक्रम


श्री संत अमरसिंह विद्या प्रतिष्ठान, प्रभाग क्रं ८ शिक्षक कॉलनी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आयोजित नवरात्रोत्वात कोजागिरी पौर्णिमा निमित्त दुध वाटपाचे मान्यवर गव्हर्मट कॉन्ट्रॅक्टर श्री विवेकशेठ मुळे व तुषारशेठ टाक त्यांच्या माध्यमातून केले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत मैफिल कार्यक्रम प्रभागातील गायक, गायिका तसेच वेगवेगळे वाद्य वाजवणारे वादक या कलाकारांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संगीत मैफिल व दूध वाटप कार्यक्रम घेऊन कोजागिरी पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

यावेळी संगीत मैफिल कार्यक्रमातील कलाकार श्री कचरू पंडित सर, कु. वेदिका पवार, सौ. माधुरीताई गोंदकर, कु.वेदिका गोंदकर, श्री प्रशांत गोंदकर सर, सौ.जयश्री सोनार मॅडम, श्री. बाबुराव सोनार सर, श्री संतोष (महाराज) अनभुले सर, श्री संतोष खांदवे सर, चकोर कदम साहेब, श्री अभिजीत महामुनी, श्री राजेंद्र बारटक्के, श्री ॲड हरिभाऊ महामुनी साहेब, सौ. स्वातीताई सूर्यवंशी, श्री राजकुमार चौरे सर, श्री दीपक घोडेराव साहेब, श्री राजेंद्र काळे सर, सौ. मिराताई काळे, वादक श्री किरण आचार्य तसेच कार्यक्रमाचे निवेदन श्री अशोकराव नेवसे गुरुजी व निवेदिका कवयित्री, गायिका स्वाती पाटील यांनी केले. यावेळी प्रभागातील सर्व माता भगिनी पुरुष बांधव तसेच बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले.




