अधिकाऱ्यांना फोन करताच काही तासातच पाण्याने भरलेला टँकर राशीन बाजारपेठेतील रस्त्यावर.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी.राशीनमध्ये आई जगदंबेचा नवरात्र उत्सव दसरा,पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. आतापर्यंतच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक करणारी भाविक भक्तांची गर्दी शुक्रवारी पालखी दर्शनासाठी पहावयास मिळाली परंतु पालखी यात्रा उत्सव साजरा होताच दुसऱ्या दिवशी गावातील सर्व रस्ते गुलालानी माखलेले बघतात मॉर्निंग वॉक साठी आलेल्या मा. सभापती पै.शामभाऊ कानगुडे यांचे लक्ष गुलालांनी माखलेल्या रस्त्यावर जाताच सार्वजनिक विभाग अधिकाऱ्याला फोन करताच तालुका अधिकारी वाकचौरे यांना जाग आली.

त्यांनी त्वरित कर्मचाऱ्यांना आदेश देताच काही तासातच पाण्याने भरलेला टँकर राशीन मुख्य रस्त्यावर पाण्याची फवारणी करताना दिसला. श्याम भाऊ कानगुडे स्वतः पाण्याने भरलेल्या टँकरच्या समोर उभा राहून मुख्य रस्त्यावरील माखलेला गुलाबी रस्ते पाण्याच्या टँकरद्वारे फवारणी करून स्वतः उभा राहून मुख्य बाजारपेठेतील रस्ते स्वच्छ करून घेतले. यालाच म्हणतात शामभाऊ कुछ खास है, क्योकी उसमे अधिकारीयोसे अकेले झुंजने की अलग ही बात है.




