पुण्यात शंभू ऑईल मिल व मसाले शाखेचे भव्य उद्घाटन


(कर्जत प्रतिनिधी) :- कर्जतकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता पुणेकरांसाठी शुद्ध लाकडी घाणा तेल आणि घरगुती मसाल्यांची खास सेवा उपलब्ध होणार आहे. दिनांक 05 ऑक्टोबरपासून पुण्यातील कोथरूड येथे शंभू ऑईल मिल व मसाले शाखा क्रमांक. 02 चे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात सोहळा 06.00 वाजता पार पडणार आहे.

आरोग्यासाठी शुद्ध, पारंपरिक आणि रसायनमुक्त वस्तूंची वाढती मागणी लक्षात घेता शंभू ऑईल मिलने पुण्यातील नागरिकांसाठी या नव्या शाखेची स्थापना केली आहे. येथे ग्राहकांना शुद्ध लाकडी घाण्यात तयार होणारे तेल तसेच घरगुती मसाले उपलब्ध होणार आहेत.

या भव्य उद्घाटन सोहळ्याला शहरातील नामवंत मान्यवर उपस्थित राहून उद्घाटन करणार आहेत. यामध्ये पुणे पोलीस उपायुक्त सौ. व श्री. संभाजी कदम, माजी उपमहापौर पुणे सौ. व श्री. बंडू (तात्या) गायकवाड, सहायक अन्न व औषध प्रशासन अधिकारी मा. सौ.व श्री.आतिष सरकाळे, समाजसेवक श्री. महेश (दादा) तनपुरे, तसेच श्री. अँड धिरज ढेरे (शिवाजीनगर, पुणे), श्री. संतोष (काका) बोराटे पाटील आणि श्री. सुनील (काका) बोराटे पाटील यांचा विशेष सहभाग असणार आहे.

निमंत्रक म्हणून शंभू ऑईल मिल, शंभू मसाले आणि हितचिंतक मित्रपरिवार यांनी या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले असून, पुणेकर नागरिकांनी या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण – डीपी रोड, यशवंतराव नाट्यगृह समोर, कोथरूड, पुणे. ☎️ संपर्क : +91 95032 65555



