पाटेवाडी येथील निराधार महिलेस जीवे मारण्याची धमकी; पोलीस अधीक्षकांना गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी.

कर्जत (प्रतिनिधी) :- मी मौजे पाटेवाडी, ता. कर्जत, जि.अहमदनगर येथील रहीवासी इंताज शेख निराधार महिला असून मला कोणाचाही आधार नाही. असे असताना आमचे पाटेवाडी, ता. कर्जत गावातील इसम नामे १) मोहन पांडुरंग कदम, २) नंदा मोहन कदम, ३) सोन्या मोहन कदम, ४) मोन्या मोहन कदम हे सर्व मराठा जातीचे असुन त्यांचा गावात फार मोठा जोडजमाव असल्यामुळे व मी सदर गावात अल्पसंख्यांक मुसलीम समाजाची निराधार महीला असल्यामुळे व मला कोणाचाही आधार नसल्यामुळे हे लोक मला नेहमीच काहीतरी कुरापती काढून माझेबरोबर भांडणतंटा करतात, घाणघाण शिवीगाळ करतात. रेशनकार्ड धारकास मला रेशनवर माल देऊ नका म्हणून त्याला दमदाटी व शिवीगाळ करून माल देण्यापासून रोखतात त्यामुळे मला रेशनकार्ड वरील माल घेण्यास देखील अडचण निर्माण होत आहे. सदर मोहन पांडुरंग कदम हा माजी सरपंच असून राजकीय पुढारी असल्यामुळे त्याचा गावात व तालुक्यात दबदबा आहे त्यामुळे त्याचे कुटुंबाचा कर्जत पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत.
शुक्रवार दिनांक १०/११/२०२३ रोजी सकाळी ९.३० वाजणेचे सुमारास काहीएक कारण नसताना नंदा मोहन कदम ही शिवीगाळ करीत माझ्या घरी आली व म्हणाली की, मी तुला गावात राहू देणार नाही व तू माझ्या दिराच्या रेशन दुकानात तू माल घेण्यास यायचे नाही, आलीस तर मी तुझ्या झिपऱ्या धरुन त्याच ठिकाणी तुला मारीन असे म्हणून तीने ग्रामपंचायत कार्यासमोरील त्यावर जाऊन मला मोठमोठया सुरुवात केली असता मी तीला म्हणाले की, मला ग्रामपंचायत रस्त्यावर जाऊन मोठमोठयाने शिवीगाळ का करता असे विचारले असता ती मला म्हणाली की, मी कोठेही तुला शिव्या देईल ग्रामपंचायत व रस्ता काय तुझ्या बापाचा नाही, असे म्हणून तीने तीचा नवरा व दोन मुले यांना फोनवर गुन्हयाच्या ठिकाणी बोलावून घेतले त्यानंतर वरील सर्वजण म्हणाले की, हुला नबरा नाही, पोरे नहीं, तुझी आई मयत झाली आहे व तुला तुझ्या भावाचा देखील आघर नही
असे म्हणून वरील सर्वांनी मला पक्की ऐकून लोक माझी प्रतिष्ठ लोकांनी त्यांना समजावून सांगीतल्यामुळे त्या ठिकाणाचून ते निघून गेले व जाता जाता म्हणाले की, आज तु आमच्या तावडीतून सुटलीस परंतु तु कधी तरी आमच्या तावडीत सापडलीस तर आम्ही तुझा कायमचाच काटा काढून टाकू असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी दिली…
सदर घटनेची मी दुसरे दि.१९/११/२०२३ रोजी कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद देणेकामी गेले असता तेथील पोलीसांनी आम्ही सदर इसमांना कर्जत पोलीस स्टेशनला बोलावून घेतो व नंतर त्यांचे विरुध्द तुमची फिर्याद दाखल करून घेतो अशी तोडी समज दिली. त्यानंतर त्याच दिवशी कर्जत पोलीस स्टेशनचे तपासी अमलदार सचिन भास्कर धोरात (मोबा.नं. ९५४५५७३०११) हे पाटेवाडी येथे सदर इसमांचे घरी गेले परंतु त्यांची सदर इसमाबरोबर हातमिळवणी केल्यामुळे सदर पोलीस कॉन्स्टेबल सचिन भास्कर थोरात हे मी त्यांना फोन करून देखील आता माझा फोन उचल नाहीत व आरोपींचे विरुद्ध कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करीत नाहीत व कारवाई करण्याची टाळाटाळ करीत आहेत. वरील लोक हे अतिशय आडदांड व भंगड प्रवृत्तीचे इसम असून त्यांचा गावात फार मोठा जोड़ जमाव आहे व राजकीय वचन आहे ते कधी काय करतील याचा नेम नाही त्यांचे पासून माझे जिवीतास फार मोठा धोका निर्माण झालेला
तरी मे. साहेबांना नम्र विनंती की, वर नमूद केलेल्या घटनेची आपल्या मार्फत योग्य ती चौकशी करण्यात येऊन इसम नामे-१) मोहन पांडुरंग कदम (मो.नं. ९४०३३७६७५५), २) नंदा मोहन कदम (९५८८४५०४३०), ३) सोन्या मोहन कदम, ४) मोन्या मोहन कदम सर्व रा. पाटेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर यांनी वर नमूद केल्याप्रमाणे गुन्हा केलेला असल्यामुळे त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याबाबत कर्जत पोलीस स्टेशनला योग्य तो आदेश देण्यात येऊन मला योग्ब तो न्याय मिळवून दयावा ही नम्र विनंती मला जर आपल्याकडून योग्य तो न्याय मिळाला नाही तर मी कर्जत पोलीस स्टेशन समोर अमरण उपोषणास बसणार आहे त्यानंतर मात्र त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस खात्यावर राहील याची कृपया नोंद घ्यावी.. असे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.