मा.आ. प्रा. राम शिंदे यांच्या संकल्पनेतून राशीन येथे बौद्ध विहार बांधकामासाठी ३५ लाखाचा निधी भूमिपूजन कामाचा शुभारंभ

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी.महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने तसेच विधान परिषद सदस्य मा. आ. प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून राशीन येथे दलित वस्ती मध्ये बौद्ध विहार बांधणे कामासाठी (३५ लाखाचा) निधी उपलब्ध झाला
असून भूमिपूजन कामाचा शुभारंभ आज राशीनच्या लोकाभिमुख सौ.सरपंच नीलम भीमराव साळवे/ उपसरपंच शंकर देशमुख यांच्या व हस्ते करण्यात आला. अनेक वर्षानुवर्षे बौद्ध विहार चा प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे उपस्थित अनेक भीमसैनिकांच्या इतर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पहावयास मिळाली. तसेच आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बौद्ध विहार बांधकामासाठी मिळालेल्या (३५ लाखाच्या) दिलेल्या भरीव निधीमुळे राशीन व परिसरातील भीमसैनिक व ग्रामस्थांकडून शिंदे साहेब यांचे अभिनंदन करीत कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी , भाजपा महाराष्ट्र अल्पसंख्या युवा उपाध्यक्ष साहिल काझी, भाजपा भटके विमुक्त प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने, भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश सचिव सोयब काझी, युवक नेते भीमराव साळवे, भाजपाचे एकनाथ धोंडे, ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे, उषा मधुकर आढाव, स्वप्निल मोढळे, कॉन्ट्रॅक्टर सोहेल काझी, विशाल वाघुले, सद्दाम काझी, मोहसीन काझी,सुनील त्रंबके, संतोष डावरे, कांबळे गुरुजी, अंकुश साळवे, पोपट आदी भीमसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.