Advertisement
ब्रेकिंग

दूध दरवाढीसाठी अशोकराव खेडकर मित्रमंडळाचा वतीने कर्जतच्या तहसीलसमोर शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

Samrudhakarjat
4 0 1 4 1 5

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला मिळावा या मागणीसाठी भाजपचे नेते अशोक खेडकर मित्र मंडळाच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवार दूध 18 डिसेंबर रोजी पासून कर्जत तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला तालुक्यातील असंख्य दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

अशोक खेडकर मित्र मंडळाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्जत तालुक्यात जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई मोठ्या प्रमाणात उद्भवलेली असून पशुखाद्याचे भावही गगनाला भिडलेले आहेत. आणि अशातच दुष्काळात तेरावा महिना म्हणावं की काय मागील दीड महिन्यापासून दुधाचे भाव प्रतिलिटर दहा रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जनावरे

जगवण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. असे या निवेदनातून म्हटले आहे. तसेच कर्जत तालुक्यातील खाजगी दूध प्रकल्प चालकांनी आपली यूनियन करून शेतकऱ्याचे दध केवळ 25 रुपये लिटरने खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप खेडकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. तरी शासनाने या संदर्भात त्वरित लक्ष घालून ada दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रति लिटर 40 रुपये प्रमाणे बाजार भाव द्यावा यासाठी शासनाने अध्यादेश काढून खाजगी दूध प्रकल्प व सहकारी संस्थांना बंधनकारक करण्यात यावे. सध्या वाढलेल्या पशू खाद्याचे भाव तसेच पशुवैद्यकीय औषधे व जनावरांचे संगोपन खर्च खूप वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दूध धंद्यात मोठ्या प्रमाणात ौटा सहन करावा लागत आहे. आणि यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने दूध उत्पादकांवर आत्महत्या करण्याची वेळआली असल्याचे या निवेदनातून म्हटले आहे.

तरी या संदर्भात शासनाने लक्ष घालून दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी आज पासून तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण चालू करण्यात आले आहे. या निवेदनावर अशोक खेडकर, मंगेश जगताप, दादासाहेब खराडे, रावसाहेब खराडे, शरद यादव, संदीप शेगडे, नवनाथ लष्कर, रामजी पाटील, बाळासाहेब निंबाळकर, रघुनाथ ढेरे, सर्जेराव कवडे, अगस्ती नलवडे, जयराम खेडकर, लहू भिसे, भिसे, सुभाष गायकवाड, डॉ. धनंजय आरडे, दीपक काकडे, सुभाष गायकवाड, अमोल तोरडमल, चंद्रशेखर पठाडे, संदेश देशमुख, मनोज तोरडमल, बापूराव तोरडमल, महेश गांगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे आ. राम शिंदे, विधानसभा मतदारसंघाचे आ. रोहित पवार, तसेच दुग्धविकास अधिकारी अहमदनगर, सहाय्यक निबंधक अहमदनगर व पोलीस निरीक्षक कर्जत यांना या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker