दादा पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकले

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये प्राणीशास्त्र विभागाचा स्वप्नील गंगाधर निंबाळकर, रसायनशास्त्र विभागातील राहूल देविदास दराडे व सागर यमाजी मोटे, एनसीसी विभागाचा भाऊसाहेब सदाशिव निकत, भौतिकशास्त्र विभागाची माधुरी हिम्मत राऊत यांची महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई येथे महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे
महसूल सहाय्यक पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या स्पर्धा परीक्षा विभागाचा लाभ होत असल्याचे निवडप्राप्त विद्यार्थ्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून झालेली विविध व्याख्याने, अभ्यासिका व निरंतर चालू असलेले मार्गदर्शन याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे. याशिवाय महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. संजय नगरकर व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन वेळोवेळी सदर विद्यार्थ्यांना लाभते.
महसूल सहाय्यक पदावर भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समिती सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघ, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.