मौलाना आलीम ओबेदुल्लाह काझी यांचा राशीन मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार.

राशीन(प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील परिचित व्यक्तिमत्व असलेल्या नौशाद एम. काझी यांचा मुलगा मौलाना ओबेदुल्लाह नौशाद काझी यांनी दारुल
उलुम नादवतुल उलमा लखनौ येथून मुस्लिम धर्मीय पंथात महत्त्वपूर्ण मानली जाणारी(आलीम) पदवी प्राप्त केल्याबद्दल राशीन येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मौलाना ओबेदुल्लाह काझी यांचा टोपी, रुमाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचवेळी गेल्या 40 वर्षापासून मुस्लिम शादी (लग्न )सोहळा पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण (काझी) ची भूमिका बजावणारे व आपल्या कणखर सुमधुर आवाजात राशीन सह जिल्हाभर प्रसिद्ध असलेले मुक्तार भाई काझी मुस्लिम समाजाचे लग्न विवाह लावण्याचा (कजायत) राजीनामा दिला असून यानंतर संपूर्ण अधिकार लग्न लावण्याचा संपूर्ण अधिकार आज पासून मौलाना(आलीम) ओबेदुल्लाह नौशाद काझी यांना स्वखुशीने देण्यात आला आहे शेवटी ओबेदुल्लाह काझी यांनी आपण आलीम पदवी प्राप्त झाल्याचे संपूर्ण श्रेय माझे पिता नौशाद काझी यांनाच देतो असे म्हणत ओबेदुल्लाह यांच्या डोळ्यातील अश्रू धारा रोकता आल्या नाही.
तसेच माझा सत्कार मुस्लिम समाज बांधवांनी केल्याबद्दल सर्वांचे आभार आलीम ओबेदुल्लाह काझी व्यक्त केले. यावेळी राशीन येथील सर्व आलीम, हाफीज, व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मौलाना शहानवाज कुरेशी यांनी केले.